Pimpri News : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या निवडीवर शासनाकडून शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri News ) स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 19 फेब्रुवारी 2021 पासून प्रभारी पदभार होता. आता शासनाने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

Pune : फ्लेक्सच्या पैशांचा अपव्यय टाळत युवकांनी काश्मिरमध्ये उभारली ‘सावित्रीबाई फुले-फातिमा शेख ई-लर्निंग लॅब’

त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त (Pimpri News ) प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्रदीप जांभळे आणि विजय खोराटे हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. तर, महापालिका सेवेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेले अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.