Pimpri news: ‘वायसीएमएच’मध्ये सर्वाधिक 476 कोरोना बळी, आदित्य बिर्लामध्ये 68, तर डी. वाय.पाटील रुग्णालयात 66 जणांचा मृत्यू

पालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

0

एमपीसी न्यूज ( गणेश यादव ) – पिंपरी-चिंचवड शहरातील 1060 नागरिकांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील रुग्णालयात 876 जणांचा तर पालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात 184 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक म्हणजेच 476 मृत्यू पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात झाले आहेत. त्यांनतर आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयात 68, डॉ.  डी. वाय. पाटील रुग्णालयात 66,  लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 55, स्टार हॉस्पिटलमध्ये 51 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या 65 हजार पार झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढली आहे.

शहरातील 1060 नागरिकांचा कोरोनाने कालपर्यंत बळी घेतला आहे.शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता.

मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेर पर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती.

जुलै महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही प्रचंड वाढली, जुलै महिन्यात तब्बल 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, एकूण मृत्यू संख्या 335 वर पोहोचली होती. ऑगस्टचा पूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मृत्यूचे प्रमाण वाढले.

_PDL_ART_BTF

दिवसाला 25 ते 30 जणांचा मृत्यू होत होता. यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजाराच्या पुढे गेली आहे. कालपर्यंत शहरातील 1060 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले आहेत. 476 मृत्यू पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात झाले आहेत. त्यांनतर आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयात 68, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 66, लोकमान्य मध्ये 55, स्टार हॉस्पिटलमध्ये 51 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याशिवाय स्टर्लिंग हॉस्पिटल 27,  देसाई 17,  गुंजनकार मल्टिस्पेशालिटी 16, अण्णासाहेब मगर 16, लाईफ पॉईंट 12, स्पंदन 9, सुर्या 7, ओजेस 7, आयुष्य 7, ग्लोबल 6, आयुश्री 6, जीवनज्योती 5,  ऑनेक्स  4, सिटी कॅरे 4, आनंद मल्टिस्पेशालिटी 4, ऑक्सिकेअर 3, वत्सला 2, पल्स 2, ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर 2, सेवासदन 1 आणि पायोनिक्स हॉस्पिटलमध्ये 1 जणाचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर एएफएमसी आणि सीटीसी आर्मी हॉस्पिटल कोंढवा येथे प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील रुग्णालयात 876 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

तर, महापालिका हद्दीबाहेरील बीजे मेडिकलमध्ये 45, औंध सिव्हिल हॉस्पिटल 31, दिनानाथ 21, रुबी 9, स्पर्श 8, सह्याद्री 6, जहांगीर 5, कंमाड 5, एम्स 5, पूना 4, केम 4,  इनलॅक्स 4, बीएसटीआरएच अँड जीएच 4, एफमसी 4, सह्याद्री हडपसर 3, काशिबाई नवले 3, विश्वराज 2, द्रुपदाबाई मुरलीधर खेडेकर 2, सिम्बॉयसिस 2, सह्याद्री 2, सिटी केअर 2, भारती 2, सूर्या सह्याद्री 1, सना 1, रत्ना 1, नायडू 1, कस्तुरबा 1, ज्युपिटर 1, डिव्हिन नेरुळ 1, बडे 1, आश्विनी 1 आणि आधार हॉस्पिटलमध्ये 1 अशा 184 जणांचा शहराबाहेरील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कालपर्यंत शहरातील 1060 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्ण उशीरा दाखल होणे. बाकीचे आजार यामुळे मृत्यू होत असल्याचा दावा पालिका वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.