Pimpri News: कोरोना लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण आयुक्तांच्या ‘सेल्फी’तून

एमपीसी न्यूज – संपूर्ण देश ज्याची गेल्या आठ महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होता. त्या बहुप्रतिक्षेतील कोरोना लसीकरणाची आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि हाच ऐतिहासिक क्षण महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सेल्फी घेऊन कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

महापालिकेच्या आठ रुग्णालयात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी पहिली लस घेतली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा ऐतिहासिक क्षण सेल्फी घेऊन कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना विरोधातील लढाई मागील आठ महिन्यांपासून महापालिका अधिकारी, कर्मचारी लढत होते. सर्वांनी जीवावर उदार होवून कोरोना काळात काम केले. सर्वांच्या नजरा कोरोनाच्या लसीकडे लागल्या होत्या. आज प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली असून हा खूप आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.