Pimpri Crime News : पिस्टल व गांजासह सराईताला साथीदारासह अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने (Pimpri Crime News ) कारवाई करत सराईताला पिस्टल व गांजासह अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

 

मयूर अनिल घोलप (वय 29 रा.चिंचवडगाव) व त्याचा साथीदार शंभू संजय गंगावणे (वय 21) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक  हे शनिवारी (दि.18) हिंजवडी, मारुंजी, कासारसाई भागात गस्त घालत असताना  सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील मयूर घोलप हा पुसाणे गावाकडे येत असून त्याच्याकडे शस्त्र आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या मयूर व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेतले.

 

 

Talegaon Dabhade : महिलांनोआरोग्याकडे जास्त लक्ष द्या – सिद्धार्थ चांदेकर

 

 

पोलिसांनी त्यांच्याकडून 40 हजार रुपायांचे पिस्टल, 65 हजार रुपयांची दुचाकी, 31 हजार रुपयांचा1 हजार 240 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण 1 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून आरोपीवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर हा रोकॉर्डवरील गुन्गेगार असून  त्याच्यावर अपहरण,खुनाचा प्रयत्न, खून, बेकायदेशीर शस्त्र बाळागणे असे सात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेपोलीस तपासात उघड झाले आहे.    

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, अशोक दुधावणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, प्रदिप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदिप गायकवाड, प्रदिप गुट्टे ( Pimpri Crime News) यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.