Pimpri News: नागरिकांची मते जाणून शहर विकासाचा प्राधान्यक्रम ठरविणार – नवनियुक्त आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी चर्चा केली जाईल. त्यानुसार विकासकामाचा प्राधान्यक्रम ठरविणार असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश प्रभाकर पाटील यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. तसेच आपल्याला महापालिका कामकाजाचा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे या गावचे रहिवाशी आहेत. प्रशासकीय सेवेचा त्यांना 14 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.

सोमवारी किंवा मंगळवारी आपण पिंपरी महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी चर्चा केली जाईल. त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाईल, असे नवनियुक्त आयुक्त पाटील यांनी सांगितले.

तसेच आपल्याला महापालिका कामकाजाचा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.