Pimpri News: रुग्ण संख्येबरोबरच कंटेनमेंट झोनची संख्या घटली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिणामी, शहरातील मेजर आणि मायक्रो कंटेनमेंटची संख्याही घटली आहे. शहरात 1 मे ला 316 मेजर कंटेनमेंट झोन होते. तर, 2 हजार 232 मायक्रो कंटेनमेंट झोंन होते. महापालिकेच्या 1 जूनच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 143 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 186 आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारीच्या मध्यापासून दुसरी लाट आली. दुसरी लाट तीव्र होती. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. रुग्णसंख्या वाढू लागल्याने कंटेनमेंट झोनही वाढू लागले. मार्च नंतर कंटेनमेंट झोनची संख्या ही सत्यत्याने वाढत होती. मेजर कंटेनमेंट झोनची संख्या ही 300 च्या वर गेली होती. तर, मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या अडीच हजाराच्या जवळ गेली होती. फेब्रुवारीपासून सुरू झालेली रुग्ण वाढ आता कमी होत आहे.

रुग्ण संख्या वाढत असताना कंटेनमेंट झोन आणि गृहविलगिकरणात असणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे आणि त्यांची वेळोवेळी माहिती घेण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले. असे रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

सद्यस्थितीत पूर्वी सारखे कंटेनमेंट केले जात नाही. त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी ज्या भागात जास्त रुग्ण आढळून आले. त्या भागाला कंटेनमेंट झोन जाहीर केले जात होते. आता मेजर आणि मायक्रो असे कंटेनमेंट झोन केले जात आहेत. मार्च पासून महापालिकेने असे कंटेनमेंट झोन करणे सुरू केले आहे.

गृहनिर्माण सोसायटी मधील एका घरात किंवा सोसायटीत दोन पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर पूर्ण सोसायटी सील न करता ज्या मजल्यावर रुग्ण आढळला आहे, तो मजला सील केला जातो. त्याला मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. तर एखाद्या परिसरात दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर फक्त तो परिसर सील केला जातो. आजूबाजुचा परिसर सील केला जात नाही. त्याला मेजर कंटेनमेंट झोन म्हणतात. रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कंटेनमेंटची संख्या कमी होण्याची ही आहेत कारणे!
# मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण संख्या घटली
#होम आयसोलेशन मधील रुग्णांचे प्रमाण कमी झाले.
# कोविड केअर सेंटरमध्ये बेड उपलब्ध झाल्याने अनेकांनी घरी उपचार न घेता कोविड केअर सेंटरला उपचार घेतले.
# मागील पंधरा दिवसात नवीन रुग्णांच्या संख्येत बरे होण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.