Pimpri News : रुग्णवाढीचा ब्रेक कायम, शहरात आज 533 नवीन रुग्ण

882 जणांना डिस्चार्ज, तर 23 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक बसला आहे. तो कायम आहे. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहराच्या विविध भागातील 449 आणि पालिका हद्दीबाहेरील 84 अशा 533 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 81 हजार 372 झाली आहे.

नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 882 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 14 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 23 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात मोशीतील 42 वर्षीय पुरुष, रावेत 58 वर्षीय, चिंचवड 62 वर्षीय, चिखलीतील 44 वर्षीय, आकुर्डीतील 70 वर्षीय, दिघीतील 44 वर्षीय, कासारवाडीतील 60 वर्षीय, किवळेतील 74 वर्षीय, पिंपळेसौदागर येथील 58 वर्षीय पुरुषाचा आणि चिंचवड येथील 63, 58 वर्षीय महिला, किवळेतील 57 वर्षीय, आकुर्डीतील 74 वर्षीय वृद्ध महिला, कुदळवाडीतील 24 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

तर, पालिका हद्दीबाहेरील कुरुळीतील 78,52 वर्षीय दोन पुरुष, भवानी पेठेतील 39 वर्षीय, हिंगोलीतील 62 वर्षीय, सातारा 52 वर्षीय, धानोरीतील 73 वर्षीय, मुंढवा 65 वर्षीय, खेड 40 वर्षीय पुरुषाचा तर हडपसर येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 81 हजार 372 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 75 हजार 386 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1388 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 532 अशा 1920 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3057 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1091 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.