Pimpri News: गणपतीच्या आगमनाची, विर्सजनाची मिरवणूक काढता येणार नाही – आयुक्त हर्डीकर

या गणेशोत्सावावर कोरोनाचे मोठे सावट आहे. कोरोनाचा प्रसार शहरात वेगाने होत आहे. त्यासाठी महापालिका महत्वपूर्ण काम करत आहे.

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाची सर्वांनी मनोमन तयारी सुरु केली आहे. पण, या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे सावट आहे. कोरोनाचा प्रसार पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल. तर, कोणत्याही प्रकारची आगमनाची अथवा विर्सजनाची मिरवणूक काढता येणार नाही. महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी घाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत शहरवासीयांना आवाहन करण्याचा व्हिडिओ आयुक्तांनी पालिकेच्या ट्विटर हँडलवर टाकला आहे. त्यात आयुक्त हर्डीकर म्हणतात, गणेशोत्सवाची मनोमन तयारी सुरु केली आहे. पण, या गणेशोत्सावावर कोरोनाचे मोठे सावट आहे. कोरोनाचा प्रसार शहरात वेगाने होत आहे. त्यासाठी महापालिका महत्वपूर्ण काम करत आहे.

पोलीस कंटेन्मेंटची अंमलबजावणी करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापूर्वी साजरे केलेल्या सणांनाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचा आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही बंधने पाळायची आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल. तर, आपल्याला कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढत येणार नाही. घरातल्याच मूर्तीची शक्यतो प्रतिष्ठापना करावी. घरातल्या घरातच त्याचे पूजन करावे आणि घरातल्या घरातच विसर्जनही करावे.

महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणांवर घाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार नाही. कोणत्याही प्रकारची आगमनाची अथवा विर्सजनाची मिरवणूक काढता येणार नाही.

आपल्याला भक्ती-भाव, उत्साह कमी न करता आपल्या घरातच राहून गणरायाची मनोमन पूजा करायची आहे. सर्वांच्या आरोग्याची, शहरवासीयांच्या निरोगी जीवनाची मनोकामने प्रार्थना करायची आहे.

विद्या, कला, गुण या सर्वांची आराधना करुन हा गणेशोत्सव घरातल्या घरातच साजरा करावा, असे आवाहन करत नागरिक सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.