Pimpri News : ज्ञानज्योती महात्मा फुले यांचा पुतळा परिसर दिपोत्सवाने उजळला

एमपीसी न्यूज – समता म्हणजे प्रकाश या भूमिकेतून पुरोगामी महाराष्ट्रात समतेची वाट निर्माण करणा-या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला आदरांजली म्हणून पिंपरीतील त्यांचा पुतळा दिपोत्सावाने शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज उजळून टाकला.

प्रसिद्ध किर्तनकार शारदा मुंढे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पत्रकार व लेखक विजय जगताप, मराठवाडा जनविकास मंचचे अरुण पवार, सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे अरुण चाबुकस्वार, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, जगद्गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, ओबीसी संघर्ष सेना अध्यक्ष वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते माऊली बोराटे , राजकुमार परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.