Pimpri News: परमोच्च त्याग, समर्पण भावनेचे प्रतिक म्हणजे भगवा रंग – शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज – आदर्श कसा असावा? तो म्हणजे प्रभू श्रीराम (Pimpri News) आहेत. राजकारण धुरंधर कृती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अवतारी पुरुषांनी हातात भगवा घेतला होता. सर्वोदय आणि सूर्यात्साला अवकाश भगवेमय होते. हातात भगवा घेण्यासाठी स्वत:ची आहुती देण्याची तयारी असावी लागते. त्याच्याच डोक्यावर भगवी टोपी, फेटा शोभून दिसतो. परमोच्च त्याग, समर्पण भावना म्हणजे भगवा रंग आहे. कधी राम व्हायचे? आणि कधी कृष्ण व्हायचे? हे जाणले ते छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्यांना जी भाषा समजते. त्याच भाषेत समजवले पाहिजे. या विचारांतूनच छत्रपतींनी स्वराज्य घडवले, असे मत हिंदुत्ववादी वक्ते, अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

यावेळी अध्यात्मिक गुरू स्वामी स्वरुपानंद महाराज, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे, हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई, माजी महापौर राहुल जाधव, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, संतोष बारणे, नितीन बोराटे, सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पोंक्षे म्हणाले की,  ‘डे’ म्हणजे फादर डे, मदर डे साजरा (Pimpri News) करण्याची संस्कृती परकीयांची आहे. आपला प्रत्येक दिवस श्रीरामामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेला आहे. आपण हिंदू म्हणून जगतो आहोत. ताट मानेने उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हे सौभाग्य मिळाले आहे. राजमाता जिजाऊंनी केवळ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केले.

Bjp : शहर भाजपातर्फे वर्धापन दिनाची जय्यत तयारी

आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांनी काही वर्षांपूर्वी क्रांतिवीर सावरकर यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाबाबत तोंड भरुन स्तुती केली. तेच राजकीय मंडळी आज सावरकरांच्या विचारांना विरोध करीत आहेत. राजकीय लोकांनी सोयीनुसार समाज वाटून घेतले आहेत.

सोईनुसार देव आणि अस्मिता वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय लोकांनी व्यासपीठावर बोलताना इतिहासाचे दाखले देवू नयेत, अशी माझी भूमिका आहे. प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू श्रीराम आदर्श आहेत. प्रेरणास्थान आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.