Pimpri News: मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत चोरी

पतसंस्थेच्या कॅशियर काउंटरच्या ड्रॉवर मधून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमे-याच्या डीव्हीआर असा एकूण 13 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला

एमपीसी न्यूज – पिंपरीतील खराळवाडी येथील मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.12) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.

नंदकिशोर शंकर नकाते (वय 48, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडी येथे भगवतगीता मंदिराजवळ मोरेश्वर नागरिक सहकारी पतसंस्था आहे. मंगळवारी (दि.11) दुपारी पतसंस्था कुलूप लावून बंद केली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

पतसंस्थेच्या कॅशियर काउंटरच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमे-याच्या डीव्हीआर असा एकूण 13 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी पतसंस्था उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.