Pimpri News: टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये 51 हजारांची चोरी

घरातून 20 हजार रुपये किमतीचा आयफोन, 500 रुपयांचा एक मोबाइल फोन, दीड हजार रुपयांचे अॅलेक्सा नावाचे डिव्हाइस आणि 29 हजार रुपयांची रोकड असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

एमपीसी न्यूज – टेल्को सिनियर ऑफिसर्स हाऊसिंग सोसायटीमधील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 51 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 सप्टेंबर रोजी पहाटे एक ते सहा वाजताच्या कालावधीत घडली.

विजयकुमार राजनारायण सिंग (वय 76, रा. टेल्को सिनियर ऑफिसर्स हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग टेल्को सिनियर ऑफिसर्स हाऊसिंग सोसायटी मधील बंगलो नंबर 44 मध्ये राहतात. 3 सप्टेंबर रोजी पहाटे एक ते सहा या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी सिंग यांच्या घराच्या डायनिंग रूमच्या खिडकीचा रॉड तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 20 हजार रुपये किमतीचा आयफोन, 500 रुपयांचा एक मोबाइल फोन, दीड हजार रुपयांचे अॅलेक्सा नावाचे डिव्हाइस आणि 29 हजार रुपयांची रोकड असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.