-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: …तर माझ्या वाढदिवसाच्या ‘होर्डिंग’वर भाजपने कारवाई करावी – अजित पवार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावू नयेत, असे मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केले होते. पण, कार्यकर्त्यांनी लावलेत. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आयुक्त, महापौर, शहराचे कामकाज ज्यांच्या हातात आहे. त्यांनी कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरभर शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. पवार आज (बुधवारी) खासगी दौऱ्यानिमित्त शहरात आले होते. तुमच्या वाढदिवसानिमित्त काही गुन्हेगारांनीही फलक लावले असल्याचे विचारले असता ते म्हणाले, मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन फ्लेक्स लावू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. उद्याच्याला कोणी काय केले. ते चुकीचे असेल. तर, पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी नाही.

मी पिंपरी-चिंचवडमध्ये आज नाही, अनेक वर्षे येत आहे. पिंपरी-चिंचवकरांना माझी मते स्पष्टपणे माहिती आहेत. अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितले नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील. तर, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आयुक्त, महापौर, शहराचे कामकाज ज्यांच्या हातात आहे. त्यांनी कारवाई करावी, असे पवार म्हणाले.

काम पूर्ण होताच उद्घाटन करणे योग्य
न भाजपकडून केला जात आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, जनतेच्या सोईसाठी निर्माण केलेल्या पुलाच्या उद्घाटनाला उशीर झाला. सत्ताधाऱ्यांना वाटते आमच्या नेत्याकडूनच उद्घाटन करु, विरोधकांना वाटते कोणाच्या वेळेसाठी थांबण्यात जनतेला त्रास होऊ नये. त्यामुळे अगोदर उद्घाटन करण्याच्या घटना घडत असतात. एखादे काम पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब त्याचे उद्घाटन करणे. केव्हाही जास्त योग्य होईल, असेही पवार म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn