Pimpri corona Update : शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, 142 नवीन रुग्णांची नोंद

36 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील एकाचाही आज (मंगळवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. शहराच्या विविध भागातील 142 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 2010 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 63 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1827 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2598 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 708 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर 873 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 4155 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 613 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.