Pimpri News: कोरोनामुळे शहरात आज एकही मृत्यू नाही, 90 नवीन रुग्णांची नोंद, 163 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज, शनिवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. शहराच्या विविध भागातील 82 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 90 नवीन रुग्णांची आज नोंद झाली, तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे, हे दिलासादायक चित्र आहे.

आज एकही मृत्यू झाला नाही. शहरात आजपर्यंत 96 हजार 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 675 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1745 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 717 अशा 2462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 764 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1239 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.