Pimpri news: शहरातील एकाही रुग्णालयात ‘व्हेटिंलेटर बेड’ उपलब्ध नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेली ‘व्हेटिंलेटर’चा एकही बेड आताच्या घडीला महापालिका, खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या अधिक आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऑटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर आणि बालनगरी, घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणेविरहित रुग्णांवर उपचार केले जातात.महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका रुग्णालयात सीसीसी सेंटरमध्ये 2438, ऑक्सिजन नसलेले 186, ऑक्सिजनयुक्त 1 हजार 202, व्हेंटिलेटर नसलेले आयसीयूचे 169 आणि व्हेंटिलेटर असलेले आयसीयूचे 159 बेड आहेत. त्यातील सीसीसी सेंटरमधील 1355 बेडवर रुग्ण उपचार घेत असून 1 हजार 83 बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन नसलेल्या 179 बेडवर रुग्ण असून 7 बेड शिल्लक आहेत.

ऑक्सिजनयुक्त 1 हजार 194 बेडवर रुग्ण असून 8 खाटा शिल्लक आहेत. व्हेंटिलेटर नसलेल्या आयसीयूच्या 167 बेडवर रुग्ण असून 2 खाटा शिल्लक आहेत. तर, व्हेंटिलेटर असलेले आयसीयूच्या 159 बेडवर रुग्ण आहेत. एकही बेड शिल्लक नाही.

तर, खासगी रुग्णालयात सीसीसी सेंटरमध्ये 125, ऑक्सिजन नसलेले 2118, ऑक्सिजनयुक्त 1 हजार 771, व्हेंटिलेटर नसलेले आयसीयूचे 568 आणि व्हेंटिलेटर असलेले आयसीयूचे 251 बेड आहेत. त्यातील सीसीसी सेंटरमधील 97 बेडवर रुग्ण असून 28 बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन नसलेल्या 1 हजार 207 बेडवर रुग्ण असून 911 बेड शिल्लक आहेत.

ऑक्सिजनयुक्त 1 हजार 644 बेडवर रुग्ण असून 127 बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटर नसलेले आयसीयूच्या 527 बेडवर रुग्ण असून 41 बेड शिल्लक आहेत. तर, व्हेंटिलेटर असलेले आयसीयूच्या 251 बेडवर रुग्ण आहेत. एकही बेड शिल्लक नाही. शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरची एकही बेड उपलब्ध नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.