Pimpri News : जगदीश कदम यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी नांदेडचे कवी जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच 27 व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करून पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सुरेश कंक आणि पुणे विभाग प्रमुख राजेंद्र वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नांदेडचे कवी जगदीश कदम यांना ‘गदिमा काव्यप्रतिभा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्याचबरोबर अशोक थोरात यांच्या ‘विराणी’ या कवितासंग्रहासाठी सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह गदिमा साहित्य पुरस्कार, साहेबराव ठाणगे यांचा ‘पाऊसपाणी’, विनायक पवार यांच्या ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’, देवा झिंजाड यांचा ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’, गणेश भाकरे यांचा ‘विठुमाऊली की विठोबा’, श्रीनिवास मस्के यांचा ‘गाव भुईचं गोंदण’ या कवी व त्यांच्या काव्यसंग्रहांची निवड करण्यात आली आहे.

गदिमांचे वारसदार कवी म्हणून वर्षा बालगोपाल, रवी कांबळे, स्वप्निल चौधरी, मदन देगावकर, वैशाली मोहिते, निशिकांत गुमास्ते यांचा सन्मान 27 व्या राज्यस्तरीय गदिमा महोत्सवात करण्यात येणार आहे.

कोरोनाची परिस्थिती निवळली की लवकरच 27 व्या गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. गदिमांच्या जन्मदिवशी राज्यातील कवींना हे पुरस्कार जाहीर करताना विशेष आनंद होत असल्याचे पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like