Pimpri News: तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

Pimpri News: Three lakh fake notes seized; Four were charged पोलिसांनी 2000 रुपये दराच्या 149 नोटा आणि कार असा एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – बनावट नोटा जवळ बाळगून त्याचा वस्तू विनिमयासाठी वापर केल्याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे उघडकीस आला.

पोलीस शिपाई शहाजी वसंत धायगुडे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजता खंडोबा माळ आकुर्डी येथे पोलिसांना एक संशयित कार (एमएच 14 जीवाय 6060) आढळली. पोलिसांनी कार थांबवून बघितले असता, कारमध्ये 2000 रुपये दराच्या 149 बनावट नोटा आढळून आल्या.

बनावट नोटा आरोपींनी वस्तू विनिमयासाठी वापरल्या असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी 2000 रुपये दराच्या 149 नोटा आणि कार असा एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबत आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 489 (ब), 489 (क) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

आरोपींचा छापखाना निगडीतच

या प्रकरणातील आरोपींनी आपल्या निगडी येथील घरातच नोटांचा छापखाना सुरू केला होता. लॉकडाऊनच्या काळात आरोपींनी विशिष्ट प्रिंटरच्या साहाय्याने नोटांची छपाई केली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर छापलेल्या नोटा बाजारात आणल्या असल्याची माहिती मिळत आहे. या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.