Pimpri corona Update : आज 684 नवीन रुग्णांची नोंद, 806 जणांना डिस्चार्ज तर 21 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 684 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 77 हजार 317 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 806 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 16 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 21 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पुनावळे, पिंपळेसौदागर, भोसरी, मोशी, काळेवाडी, पिंपळेगुरव, पिंपरी, सांगवी, विशालनगर, जुन्नर, खेड, खराबवाडी, महाड, कोल्हापूर येथील रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 77 हजार 317 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 64 हजार 284 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1306 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 484 अशा 1790 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4683 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.