Pimpri News: सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी मत नोंदविण्याचा उद्या शेवटचा दिवस

'पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाढवू सायकलचा वापर' असा नारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सायकलचा वापर वाढवण्यासाठी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे. सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून या सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी उद्या (सोमवार, दि.31) हा अंतिम दिवस आहे.

‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाढवू सायकलचा वापर’ असा नारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी उद्या (दि.31) हा अंतिम दिवस आहे.

महानगरपालिकेच्या वतीने या सर्वेक्षणात नागरिकांना मत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. https://t.co/frgrDbwAi2 या पुढील लिंकवर क्लिक करून #Cycles4Change हा सर्व्हे भरता येईल. अथवा पालिकेच्या सारथी या मोबाइल ॲप्लिकेशन वर जाऊन हा सर्व्हे भरता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.