Pimpri News : वाहतूक बदल! शगुन चौकातून डिलक्स चौक-काळेवाडीकडे जाणारा मार्ग बुधवारपासून बंद

एमपीसी न्यूज – पिंपरीतील शगुन चौकातून डिलक्स चौक-काळेवाडीकडे जाणारी लेन उद्यापासून (बुधवार, दि.16) बंद ठेवण्यात येणार आहे. ड्रेनेज लाईनच्या कामानिमित्त हा तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश काढला आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवार (दि.16) पासून सोळा दिवसांसाठी हा वाहतूक बदल करण्यात आला आहे.

त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून शगुन चौकातील वाहतूक साई चौक मार्गै जमतानी चौक ते काळेवाडी पूल अशी वळवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like