Pimpri News : वाहतूक वॉर्डनला कारवाईचा अधिकार नाही; वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – वाहतूक वॉर्डन हे केवळ हाताच्या (Pimpri News) इशाऱ्याने वाहतूक नियमन करू शकतात, असे स्पष्टीकरण पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिले आहे. याप्रकरणी माहिती मागविणारा माहितीचा अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप नाईक यांनी केला होता.

 

Manobodh by Priya Shende Part 84 : मनोबोध भाग 84 – विठोने शिरी वाहिला देवराणा

 

या अर्जात प्रदीप नाईक यांनी ट्राफिक वॉर्डन ही यंत्रणा का राबवली जात आहे, तिचा उपद्रव होत असून ती नामशेष करावी, अशी मागणी केली होती. या अर्जाला उत्तर देताना सहायक आयुक्त सतीश माने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आयुक्तालया अंतर्गत वाहतुकीचे नियमन करण्यासाठी विविध वाहतूक विभागात ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. त्यांना वाहतूक नियमन हात इशाऱ्याद्वारे करावे अशा सूचना आहेत.

 

कर्तव्य करत असताना वाहनचालकांना असभ्य बोलणे, दमदाटी करणे, चावी काढून घेणे, ई-मशीन हाताळणे, याला मनाई आहे. या संदर्भात कोणताही गैरप्रकार अढळून आल्यास त्याचा त्वरित अहवाल सादर करावा, अशा सूचनाही सतीश माने यांनी दिल्या आहेत.

 

आपल्या पदाचा गैर वापर करत ट्राफिक वॉर्डन हे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करत असतात. त्याला कुठे तरी आळा बसावा यासाठी ही माहिती प्रकाशात आणणे गरजेचे होते, असे प्रदीप नाईक  (Pimpri News) सांगितले. यापुढे  कोणताही ट्राफिक वॉर्डन पदाचा गैरवापर करीत असेल तर नागरिकांनी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रीतसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.