Pimpri News: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज ‘ग्रीन सिटी क्लिन सिटी, माय ड्रीम सिटी’ अंतर्गत “वृक्षारोपण कार्यक्रम” पिंपळे सौदागर येथील नियोजित योगा गार्डनमध्ये पार पडला.

महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी विरोधी पक्षनेता नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, नगरसेविका निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले, माधवी राजापुरे, राजेंद्र राजपुरे, राजू लोखंडे, स्मार्ट सिटी जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज शेठिया, उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, ठेकेदार प्रतिनिधी केशव लावण आदी उपस्थित होते.
“हम सब का एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा” ही संकल्पना राबवून आपले पिंपरी-चिंचवड शहर हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे मत सत्तारूढ पक्षनेता व स्मार्ट सिटी संचालक नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.