Pimpri news: युवक काँग्रेसच्या वतीने पुस्तक वाटपातून बाबासाहेबांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पुस्तके वाटून कार्यरूपी अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चौक, धम्मानंद बुध्दविहार यशवंतनगर, मैत्री बुध्दविहार मोरवाडी, सांगवी, पिंपळे निलख व एच. ए. कंपनीसमोरील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ‘बाबसाहेब’ ही पाॅकेट पुस्तिका अभिवादकांना वाटप करण्यात आल्या. एकूण 500 पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे ,धम्मानंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अविनाश चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, उत्थान फाउंडेशनचे अध्यक्ष हरप्रित सिंग, संकल्प पुष्पमाला समितीचे समन्वयक रमेश जाधव, तेजस पाटील, जावेद शेख, अतूल अल्हाट, सुरज पांचाळ आदी उपस्थित होते.

नरेंद्र बनसोडे म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला मुख्यत्वे मानवतेवर व सामाजिक समतेवर आधारित संविधान बहाल केले. देशाला नवी कायदेशीर वाटचाल दिली. जीवनमुल्ये दिली व ‘शिका संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा संदेश दिला. बाबासाहेबांना वाचनाची विशेष आवड होती. ते खुप पुस्तके वाचत व त्यांच्या जीवनात वाचनाला व अभ्यासाला खुपच महत्व होते. आजच्या पिढीने सुध्दा सखाेलपणे वाचावे. युवा पिढीला वाचणाची प्रेरणा व आवड निर्माण व्हावी. त्यातून जीवनाचा उत्कर्ष व्हावा. तसेच या पुस्तिका वाटप करून जयंती दिनी बाबासाहेबांच्या आवडीच्या कार्याला चालना देऊन बाबासाहेबांना अभिवादन करावे”, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.