Pimpri news: युवक काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस युवक काँग्रेसतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी, अजमेरा काॅलनी येथे काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक मंगल, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासिर चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी अशोक मोरे म्हणाले, “इंदिराजींनी देश घडवला, देशात विकासाचे नंदनवन फुलवले. देश संरक्षण दृष्टया, कृषी क्षेत्रासह औद्योगिक बाबतीत तसेच अर्थिक नियोजनाच्या बाबतीत संपन्न केला. प्रसंगी प्राणांची पर्वा न करता कठोर निर्णयही घेतले. जागतिक स्तरावर देशाची मान उंचविण्याचे काम इंदिराजींनी केले. ख-या अर्थाने इंदिराजीनी भारतमातेच्या भूमिकेत भारत देशाचे संगोपन केले.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.