Pimpri News: महापालिकेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) आणि शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती (Jayanti)  उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त महापालिकेच्या   मुख्य प्रशासकीय भवनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे (Meyor usha Dhore), खासदार श्रीरंग बारणे (Mp Shrirang Barne) यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शले, मीनल यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे आदी उपस्थित होते.

नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौरांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. देशाभिमान ओतप्रोत भरलेल्या नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संघटन कौशल्य होते. तरुणपिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी रुजावी यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहिल, असे महापौर ढोरे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.