Pimpri news: राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सविता खुळे, निर्मला गायकवाड, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, सारिका सस्ते, अश्विनी जाधव, कमल घोलप, निर्मला कुटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.