Pimpri News : पालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते महापालिका भवनातील प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आज, बुधवारी सकाळी मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

वल्लभनगर व कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुतीराव गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.