Pimpri News : मनसेच्यावतीने शिवाजी महाराज यांना अभिवादन

0

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग पिंपरी चिंचवड शहरातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मनसेचा पदाधिकाऱ्यांनी एच. ए.  कंपनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, उपशहराध्क्ष मिलिंद सोनवणे, नाथा शिंदे, उपविभाग अध्यक्ष महेंद्र निशीगंध, प्रभाग अध्यक्ष युवराज शिंदे, संजय मोरे तसेच सचिन शिंदे, मुन्ना कुरेशी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवरायांचा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘ जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.