_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: महापालिका शिक्षण समिती सदस्यपदी तुषार हिंगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी भाजपचे तुषार हिंगे यांची आज (मंगळवारी) महासभेत निवड करण्यात आली. माया बारणे यांनी राजीनामा दिल्याने शिक्षण समितीतील एक जागा रिक्त झाली होती. त्याजागी हिंगे यांची निवड झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) आयोजित करण्यात आली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शिक्षण समितीची मुदत जुलै महिन्यात संपली होती. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नवीन सदस्यांची निवड झाली नव्हती. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात भाजपच्या माया बारणे यांचाही समावेश होता.

मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे समितीतील एक जागा रिक्त होती. त्याजागी भाजपचे तुषार हिंगे यांची निवड करण्यात आली. शिक्षण समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक असे नऊ सदस्य आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.