Pimpri crime News : चालत्या गाडीत आयपीएल मॅचवर बेटींग घेणा-या दोघांना अटक; 24.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चालत्या कारमध्ये फिरून क्रिकेट मॅचवर बेकायदेशीरपणेरित्या सट्टा घेणाऱ्या दोघांना छापा टाकून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 24.27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी येथील साई आंगन हाॅटेल समोर आज (दि.26) पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.

लालचंद देविदास शर्मा ( वय 49, रा. सुखवानी एम्पायर, पिंपरी ) व चेतन जयरामदास कोटवाणी (वय 50, संजय लायब्ररी जवळ, पिंपरी ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे कारमध्ये फिरून क्रिकेट मॅचवर (आयपीएल) बेकायदेशीरपणेरित्या सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टिम तयार करून पिंपरी येथील साई आंगन हाॅटेल समोर सापळा रचून टाकून आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याजवळून चार मोबाईल, एक नोटबुक, दोन पेन, एक कॅल्क्युलेटर, एक इनोव्हा गाडी व रोख रक्कम 5,850 रुपये असा एकूण 24 लाख 27 हजार 950 रुपयांचा मुद्दमाल जप्त केला.

या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.