Pimpri News: चाकूने वार करून मोबाइल पळवणाऱ्या दोघांना अटक

आरोपी मोसिन याने फिर्यादी यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

एमपीसी न्यूज – चाकूने वार करून मोबाइल फोन जबरदस्तीने पळवून नेणा-या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीची घटना शनिवारी (दि. 5) सकाळी आठ वाजता कॅनरा बँकेच्या एटीएम समोर खराळवाडी येथे घडली.

मोसिन समीर सय्यद (रा. खराळवाडी, पिंपरी), शुभम अमर नरीया (रा. खराळवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक गोपालराव डहाळे (वय 58, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डहाळे शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास खराळवाडी बसस्टॉपजवळ कॅनरा बँकेच्या एटीएम समोर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन (एमएच 14 जीबी 9362) या दुचाकीवरून दोन चोरटे आले.

आरोपी मोसिन याने फिर्यादी यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जबरदस्तीने चोरून नेला. आरोपी शुभमच्या दुचाकीवरून दोघे चोरटे पळून गेले. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.