Pimpri News : महापौर निधीतून दोन कार्डियाक रुग्णवाहिका, रक्तपेढीकरीता एक मिनीबस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थिती आणि कार्डियाक रुग्णवाहीकेची कमतरता विचारात घेवून महापौर निधीतून दोन रुग्णवाहीका आणि रक्तपेढीकरीता एक मिनीबस खरेदी करण्यात आली आहे. महापौर उषा ढोरे आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, माजी नगरसदस्य शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रूग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

कार्डियाक रुग्णवाहीकांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची व्यवस्था, स्ट्रेचर तसेच स्टोअरेजची सोय आहे. तसेच त्या वातानुकूलीत आहेत. दोन रुग्णवाहीका खरेदीसाठी 43 लाख 92 हजार इतका खर्च आलेला आहे. तर 25 आसन क्षमतेच्या वातानुकूलीत मिनीबसमध्ये रक्तपेढीचे साहित्य तसेच रक्तसंकलन अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासाकरीता सोय करण्यात आलेली आहे. या बसच्या खरेदीसाठी 22 लाख इतका खर्च आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.