Pimpri News : वेदापेक्षा वेदना समजून घ्या : डॉ. अभिजीत सोनवणे

एमपीसी न्यूज – ‘भिक्षेक-यांना स्टेथोस्कोपने तपासणे ही भगवंताची आरती आणि त्यांना आंघोळ घालणे हाच माझ्या देवाचा अभिषेक असतो’, अशा भावना भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून संबोधले जाणारे डॉ. अभिजीत सोनवणे यांनी व्यक्त केल्या.

डॉक्टर दिनानिमित्त, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड आयोजित कृतज्ञता सम्मान सोहळ्यामध्ये सन्मानाला उत्तर देत असताना डॉ. अभिजीत बोलत होते.

दरवर्षी एक जुलैला ‘लायन्स क्लब ऑफ भोगापूर गोल्ड’ डॉक्टर दिन साजरा करतात. या दिवशी समाजात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कृतज्ञता सम्मान म्हणून देऊन गौरविण्यात येते. यावर्षी डॉ. अभिजीत सोनवणे आणि डॉ. शंकर गायकवाड यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच या प्रसंगी कोरोना काळातही आपली रुग्णसेवा चालू ठेवणारे
डॉ. कृष्णकांत मानकर, डॉ. शीतल मानकर,  डॉ. रामूक सुराणा, डॉ. अनिल खाडे, डॉ. संतोष मोरे, डॉ. योगेश आहेर, डॉ. अनु गायकवाड, डॉ. स्नेहल गायकवाड, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. माधुरी गायकवाड, डॉ. दिपाली कुलकर्णी यांनाही सन्मानित करण्यात आले. नुकतीच वैद्यकिय पदवी घेतलेल्या डॉ. श्रावणी ढोकले, डॉ. सौम्या साबळे यांनाही सम्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु अरुण जामकर होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात रुग्ण सेवा करणा-या डॉक्टरांवर हल्ले करण्याच्या कृतघ्नपणाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि लायन्स क्लबच्या कृतज्ञता सोहळ्याचे कौतुकही केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. हेमंत नाईक उपस्थित होते. लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था सदैव डॉक्टर्सबद्दल कृतज्ञ राहील आणि जास्तीत जास्त सेवा कार्ये सामाजिक बांधिलकी जपेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. विलास साबळे यांच्या साबळे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे संस्थापक अध्यक्ष ला. डॉ. विलास साबळे आणि विध्यमान अध्यक्षा ला. सुरेखा साबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सचिव जयश्री साठे यांनी सर्वांचे स्वागत केले. अध्यक्ष सुरेखा साबळे यांनी प्रस्तावना केली.

या वर्षातील पहिलेच सेवाकार्य असून वर्षभर अशीच सेवा – कारातील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ला. मुरलीधर साठे, माजी अध्यक्ष अरुण इंगळे, मुकुंद आवटे, बोऱ्हाडे परशुराम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन ला. प्रा. दिगंबर ढोकले व डॉ. सौम्या साबळे यांनी केले. ला. डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.