Pimpri News : कोरोना योद्ध्याचा अनोखा उपक्रम, फेसबुक लाईव्हद्वारे तणावग्रस्तांचे मनोरंजन

एमपीसी न्यूज – संपूर्ण कोरोना काळात रवींद्र कांबळे यांनी पीसीएमसीचा कर्मचारी या नात्याने कोरोना योद्धा म्हणून काम केले आणि रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तणावग्रस्त वातावरणात नागरिकांच मनोरंजनही केले. गेली वर्षभर ते नित्य हा कार्यक्रम करीत आहेत.

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. वेगवान जगाला ब्रेक लागला आणि लॉकडाऊन नावाची संकल्पना लोकांच्या मनात धस्स करून बसली आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगारी कौटुंबीक तानतणाव वाढलेत. घरी बसून लोकांचे मानसिक आजारही बळावले.

_MPC_DIR_MPU_II

अशा वेळी रवींद्र कांबळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गायनाद्वारे मनोरंजन करून लोकांना मानसिक आधार देण्याचं काम अद्यापही दररोज सायंकाळी साडेसात ते रात्री साडे नऊपर्यंत करीत आहेत. त्यांच्या फेसबुक लाईव्हला देश-विदेशामधूनही व्यूव्हर्स लाभत आहेत. मागील वर्षी 27 मार्चला त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली होती.

बालवयातच गायनाची आवड असल्याने नोकरी सांभाळत गांधर्व महाविद्यालयातून गायनाचे धडे घेत, आवड जोपासली आहे. बाहेर कोरोना योद्धा म्हणून जबाबदारी सांभाळत घरी आल्यानंतर प्रकाश, ध्वनी यंत्रणा, लॅपटॉप आणि माईक लावून फेसबुक लाईव्हद्वारे हॅलो फर्माइश कार्यक्रमामधून गाणी सादर करत, नागरिकांच्या तणावग्रस्त जीवनाला मनोरंजनाचं रूप देत आहेत.

रवींद्र कांबळे म्हणाले, ‘कोरोना योद्धा म्हणून काम करीत असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मानसिकता खूप जवळून अनुभवली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे घरोघरी तणावाच वातावरण असल्याने मनोरंजन करून हा तणाव कमी करावा या हेतूने उपक्रम सुरू केला. आजपर्यंत 342 प्रयोग पूर्ण झाले आहेत. गिनीज बुकमध्ये 200 दिवसांच्या विक्रमाची नोंद आहे. जागतिक रेकॉर्ड होण्याची वाटचाल आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.