Pimpri News: ‘विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर आता पोलीस करणार कारवाई’

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता पोलीस कारवाई करणार आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही वृक्षतोड करत असल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या बेकायदा वृक्षतोडीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. वृक्षतोड करून पालिका झाडाच्या बुंध्यातून ऑक्सिजन निर्मिती करणार काय, असा संतप्त सवालही पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला होता. शहराच्या बहुतांश भागात बेकायदा वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना कोणीही वृक्षतोड करत असल्यास सीआरपीसी 152 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संवक्षण व जतन अधिनियम 1975 कलम 20 (क) अनव्ये प्रतिबिंब करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.