Pimpri News :…तोपर्यंत प्रत्येक सण काळा दिवस :संभाजी ब्रिगेड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शिवरायांची बदनामी करणाऱ्या श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा करणार नाही, व प्रत्येक सण काळा दिवस असेल, असा पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.

श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली तसेच तक्रार अर्ज दाखल केले. पण, पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जोपर्यंत श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रत्येक सण काळा दिवस असेल. अनेक मावळ्यांनी दिवाळी साजरी केली नाही. मकरसंक्रांतही साजरी केली नाही.

आजपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, उपाध्यक्ष सतीश काळे, संघटक ज्ञानेश्वर लोभे यांनी निषेध केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.