Pimpri News : लससाठा उपलब्ध न झाल्याने सोमवारी शहरातील लसीकरण बंद

एमपीसी न्यूज – शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण सोमवारी (दि. 17) बंद राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे सोमवारी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व लसीकरण केंद्र बंद असणार आहेत. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण केंद्र बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी करु नये, असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर रविवारी (दि. 16) एक हजार 579 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. आजवर शहरातील 4 लाख 63 हजार 494 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.