Pimpri Corona Update : 10 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण; 431 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 189 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 189 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 431 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 796 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. शहरातील 10 लाख नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिकेने लसीकरणाचा दहा लाखाचा टप्पा पार केला आहे.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 336 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 63 हजार 802 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 796 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 189 रुग्ण गृहविलगीकरणात असून 607 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 39 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 410 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 155 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 10 लाख 4 हजार 612 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.