Pimpri News: रावेत जलउपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम पूर्ण; पाणीपुरवठा सुरू

बुधवारी सकाळी पाणीपुरवठा थोडा विस्कळीत राहण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर करून पूर्ण केले आहे. रात्रभर काम सुरू होते. आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजता पंपिंग सुरू झाले असून शहरातील पाणीपुरवठा सुरू झाला. उद्या (बुधवारी) सकाळचा पाणीपुरवठा थोडा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी याबाबतची माहिती दिली. मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

रावेत येथील टप्पा 1 पंप हाऊस मधील ‘वॉल्व’ फुटला सोमवारी फुटला होता. पंप हाऊसमध्ये पाणी झाले होते. त्यामुळे कालपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होता. सर्व इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये पाणी गेल्यामुळे सर्व पॅनल पूर्णपणे कोरडे केल्याशिवाय पंप चालू करता येत नव्हते.

वॉल्व फुटण्याची घटना पहिल्यांदाच घडली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम पूर्ण केले. काल रात्रभर आणि आज दिवसभर काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजता काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पंपिंग सुरू झाले असून शहरातील पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

मात्र, उद्या (बुधवारी) सकाळचा पाणीपुरवठा थोडा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.