Pimpri News: महापालिकेच्या आशा स्वयंसेविकांसाठी विविध स्पर्धा, विजेत्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – आशा दिवसाचे औचित्य साधून आशा स्वयंसेविका (Pimpri News) यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांची निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या असणा-या आशा स्वयंसेविका यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व समाजातील अन्य महत्त्वपूर्ण घटक यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘आशा स्वयंसेविका’ हा एक महत्वपूर्ण दुवा आहे. आरोग्य संवर्धन, विविध प्रतिबंधक व उपचारात्मक उपाययोजना तसेच समाजामध्ये जाणीव व जागृती वृद्धिंगत करणे यामध्ये आशा स्वयंसेविकेची महत्त्वाची भूमिका आहे.
आरोग्य सेवा व आरोग्य संस्थाची माहिती सर्व घटकांपर्यत उपलब्ध करुन देणे, आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, आरोग्याच्या बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक बदल घडवून आणणे इ. महत्त्वपूर्ण कामे आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करण्यात येत आहेत.
महापालिकेमध्ये आशा स्वयंसेविका यांना शासन मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्यात येत असून त्या यामाध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत. आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण व्हावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, आशा स्वयंसेविकांच्या भूमिका आणि जबाबदारीबाबत जनमानसात जाणीव- जागृती व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने संभाजीनगर येथील आर.डी.आगा कम्युनिटी सेंटरमध्ये गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा (Pimpri News) स्वयंसेविका यांचा आशा दिवस साजरा केला.
Maharashtra : राज ठाकरेंच्या आव्हानाची तात्काळ दखल; माहीम खाडीतील दर्ग्याचे बांधकाम हटवले
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.सुनिता साळवे, डॉ.ऋतुजा लोखंडे, रोटरी क्लबच्या डॉ.विभा झुत्सी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या भोईर, डॉ.अंजली ढोणे, डॉ.विजया आंबेडकर, डॉ.कल्पना गडलिंकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे व 210 आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.