Pimpri News : पिंपरी विधानसभा क्षेत्रात निघाली  वीर सावरकरांची भव्य गौरव यात्रा; नागरिकांकडून पुष्पवृष्टीद्वारे  स्वागत

एमपीसी न्यूज : – भारत मातेसाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ( Pimpri News ) यांची भव्य गौरव यात्रा पिंपरी विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली. आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून आकुर्डी गाव मार्गे दत्तवाडी विठ्ठल मंदिरा पर्यंत अत्यंत दिमाखात ही यात्रा काढण्यात आली. नागरिकांकडून ठिकठिकाणी पुष्पवृष्टीद्वारे यात्रेचे स्वागत करण्यात आले.

Pune : प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करायलाआम्ही संजय राऊत नाही – चंद्रकांत पाटील

भारत मातेचे पूजन करून यात्रेची सुरुवात झाली. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, अमित गोरखे, राजेश पिल्ले,मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे,नितीन वाटकर यांनी भारत मातेचे पूजन केले.

या यात्रेसाठी वीर सावरकरांचा भव्य व अत्यंत देखणा रथ बनवण्यात आला होता. वीर सावरकरांची गीते लावली होती. ढोल ताशा पथक त्याचबरोबर महिलांनी बांधलेले भगवे फेटे व पुरुषांनी घातलेल्या भगव्या टोप्या व उपर्णे यामुळे अत्यंत शिस्तबद्ध अशी भव्य दिव्य मिरवणूक  आकुर्डीगावातून निघाली. टाळ मृदुंग असलेले वारकरी पथक अत्यंत जल्लोषात या यात्रेत सहभागी झाले होते. व्यापारी मंडळींनी सावरकरांच्या रथावर ठिकठिकाणी थांबून पुष्पवृष्टी केली. तीन किलोमीटरच्या या यात्रेमध्ये एक हजार पेक्षा जास्त नागरिक कार्यकर्ते व सावरकर प्रेमी उत्साहात सहभागी झाले होते.  भरत आमदापुरे यांचे वीर सावरकर या विषयावरील व्याख्यानाने या यात्रेची सांगता करण्यात आली.

त्याप्रसंगी बोलताना भरत आमदापुरे म्हणाले, “सावरकरांना विरोध करणारे राजकीय स्वार्थाने बरबटलेले आहेत. सावरकर हे हिंदुत्ववादी होते. पण देशात सर्व समाजाला समान अधिकार हवेत. सर्व धर्म समभाव माननारे सावरकरच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांचे समाज एकिकरणाचे विचार एकच होते. समाजहित आणि देशासाठी त्यांचे विचार होते,ते कुठेही एकतर्फी भूमिकेतून वागले नाहीत.

सावरकरांचे विचार कुणीही वाचत नाही, ऐकीव चुकीच्या माहितीवर सावरकरांना बदनाम करण्याचे कट कारस्थान विरोधक करीत आहेत. ते जेवढा विरोध  करतील तेवढे सावरकर लोक जास्त वाचतील. कोणतेही महापुरुष हे देशासाठी प्रचंड झिजले आहेत. गांधी,फुले , आंबेडकर,शाहू महाराज यांनी प्रत्येकानी एक विषय घेऊन एक भूमिका ठरविली व त्यावर समाजासाठी काम केले. त्यामुळे हे सर्वच महापुरुष आपल्यासाठी वंदनीय आहेत.  सावरकरांचे विचार हिंदुत्ववादी होते,जहाल होते. परंतु, एकच( Pimpri News )  धेय त्यांनी ठेवले ते म्हणजे देश आणि धर्म टिकला पाहिजे. समाज क्रांतीचा विचार त्यांनी मांडला म्हणून सावरकर आमच्यासाठी विर सावरकर ठरतात”.

यात्रा यशस्वी होण्यासाठी आमदार  खापरे , गोरखे, खाडे,  अनुप मोरे , केशव घोळवे,  संदीप वाघेरे , माऊली थोरात , सुजाता पलांडे,  कैलास कुटे,  प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, सुप्रिया चांदगुडे, अमोल थोरात, माऊली थोरात, संजय मंगुडेकर, गणेश लंगोटे ,समीर जावळकर ,अतुल इनामदार, महेंद्र बाविस्कर,सोनाली हिंगे,अनुराधा गोरखे, आर एस कुमार, जयेश चौधरी, मदन गोयल, महेश कुलकर्णी, तेजस्विनी कदम, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, गणेश ढाकणे, विशाल वाळूजकर, कोमल शिंदे, कोमल काळभोर, प्रदीप बेंद्रे, नंदू भोगले, विजय शिनकर,  शीतल शिंदे, सुरेश गदिया, रघुनाथ जवळकर,गोपाल केसवांनी यांनी प्रयन्त केले.

सावरकर गौरव यात्रा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे यांनी आभार मानले.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share