Pimpri News: कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; अखेर महापौरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मिसेस पिंपरी-चिंचवड सौंदर्य स्पर्धेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौर उषा ढोरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात आज (बुधवारी) दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

जवाहर मनोहर ढोरे (रा. मल्हार गार्डन, नवी सांगवी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महादेव मारुती शिंदे (वय 54, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जवाहर हे महापौर उषा ढोरे यांचे चिरंजीव आहेत.

जवाहर ढोरे यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि.22) सायंकाळी साडेसात ते रात्री पावणेदहा या वेळेत मिसेस पिंपरी-चिंचवड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनाच्या अनुषंगाने सरकारच्या प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरक्षित अंतराचे पालन केले नाही.

उपस्थित ब-याच लोकांनी तोंडावर मास्क लावले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कलम 188 प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.