Pimpri Corona News : लसीकरण केंद्रावर सुरक्षित अंतराचे उल्लंघन : मंगला कदम

केंद्रावर किती लसीकरण होणार, याची माहिती एक दिवस अगोदर प्रसिद्ध करावी

 एमपीसी न्यूज – लसीकरण केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासून नागरीकांच्या रांगा लागत आहेत. केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना बाधित रुग्ण वाढविण्यास मदत करत आहेत. त्यासाठी महापालिकेने एका लसीकरण केंद्रावर एका दिवसात किती लसीकरण होईल, हे एक दिवस अगोदर प्रसिध्द करावे, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका कदम यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून कोरोना नियत्रंणासाठी महापालिकेने कोरोना लसीकरण मोहिम चालू केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात व खाजगी रुग्णांलयांमध्ये तसेच स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू केली आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे नागरीकांना लसीकरणाचे महत्त्व समजले. त्यामुळे नागरीक लसीकरणास उत्तम प्रतिसाद देत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मागील चार पाच दिवसापासून लसीकरण केंद्रावर लशीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे लस कमी व नागरीक जास्त अशी परिस्थिती निर्माण होत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना बाधित रुग्ण वाढविण्यास मदत करीत आहेत.

त्यामुळे मनपाने एका लसीकरण केंद्रावर एका दिवसात किती लसीकरण होईल हे एक दिवस अगोदर प्रसिध्द केल्यास लसीकरण केंद्रावर नागरीक गर्दी करणार नाहीत. त्याच प्रमाणे मोठ्या सोसायट्यामध्येही लसीकरण केल्यास गर्दी टाळता येईल. काही अंशी कोरोनास अटकाव करता येईल. त्या दृष्टीने सुध्दा प्रयत्न गरजेचे आहे.

तसेच कोरोना संदर्भांत महापालिकेच्या अधिका-यांना फोन केल्यास ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाबत आवश्यक माहिती मिळत नाही. कोरोना लसीकरणासाठी वेगळी हेल्पलाईन चालू करण्याचाही गरज आहे, असेही कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.