Pimpri News: विश्व हिंदू परिषदेचे गोवंशासह महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील बेवारस जनावरांचे संगोपन करण्याकरिता पाच एकर जागा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे गोवंशासह आज (शुक्रवारी) साडेचारच्या सुमारास महापालिकेसमोर आंदोलन केले.

जय श्रीराम, जय श्रीराम, गो माता की जय, अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आंदोलकांची धरपकड झाली.

चिंचवड विभाग मंत्री नितीन वाटकर, कुणाल साठे, संजय शेळके, धनंजय गावडे, संदेश भेगडे, अभिजीत शिंदे, धनाजी शिंदे, निलेश चासकर, नाना सावंत, संभाजी बालघरे, प्रशांत मोरे, गौरव पाटील आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

नितीन वाटकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत भटकी जनावरे दोन ते अडीच हजार आहेत. या जनावरांमुळे वाहनांचे अपघात होतात. दुर्घटना घडतात. त्याकडे महापालिका लक्ष देत नाही. छोट्या पक्षांकडे पालिकेचे लक्ष आहे. पण, मोठ्या जनांवरांकडे कोणाचे लक्ष नाही. रस्त्यावर जनावरे पडतात. जनावरांची कत्तल केली जाते. या भटक्या जनावरासांठी पालिकेने चिखलीत पाच एकर जागा दिली आहे. पण, लेटीगेशनमध्ये ते अडकली आहे. ती जागा लवकर देणे आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.