Pimpri News: शहर शिवसेनेच्या युवा अधिकारीपदी विश्वजित बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या युवा अधिकारीपदी विश्वजित बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

विश्वजित बारणे हे चिंचवड विधानसभा युवा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये मोठे कार्य केले. गोरगरिबांना अन्नधान्यासह विविध प्रकारची मदत केली. कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेची जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्तीबाबत बोलताना विश्वजित बारणे म्हणाले, “अडीच वर्षांपासून चिंचवड विधानसभा क्षेत्रातील युवा सेनेच्या पदाधिका-यांसोबत काम करत होतो. आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविले. साहेबांच्या आशीर्वादाने आता शहरभर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शहरात फादर बॉडी, युवा सेनेला सोबत घेऊन वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. युवा सेनेची संघटनात्मक बांधणी मजबूतीने करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत युवा सेनेतील सक्षम पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळवून देणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.