Pimpri News: अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ वृक्षमित्रांचे महापालिकेसमोर उपोषण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोड आणि महापालिका उद्यान विभागाच्या भुमिकेविरोधात वृक्षमित्र प्रशांत राऊळ आणि आंगोळीची गोळी संस्थेचे तनय पाठकर महापालिकेच्या आऊट गेटसमोर उपोषणाला बसले आहेत. अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत.

याबाबत बोलताना वृक्षमित्र प्रशांत राऊळ म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात अवैध वृक्षतोड होत आहे. उद्यान विभागाची भूमिका वृक्षतोडीच्या धार्जिणी आहे. रस्त्याच्या बाजूला उपोषण करत असताना महापालिका पोलिसांकडून आम्हाला उपोषण करुन दिले जात नाही.

_MPC_DIR_MPU_II

परवानगी नसल्याचे कारण सांगितले जाते. सर्वच गोष्टीबाबत परवानगी आवश्यक असते, तर वृक्षतोडीसाठी परवानगी का मागितली जात नाही. परवानगी नसताना वृक्षतोड केली जाते. त्याची शहानिशा पोलीस का करत नाहीत, असा सवाल राऊळ यांनी उपस्थित केला.

उपोषण करणे हा आमचा संविधानिक हक्क असताना परवानगीच्या नावाखाली उपोषण करु दिले जात नाही. वाईट कामासाठी परवानगीची गरज लागत नाही. पण, शहरातील झाडे वाचविण्यासाठी, अवैध वृक्षतोड रोखणे, झाडे जगावीत, पर्यावरण वाचावे, ऑक्सीजन निर्माण व्हावा यासाठी महापालिका, पोलीस आयुक्त, उद्यान विभागाला सांगितले. पर्यावरण मंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला.

तरी देखील आम्हाला कोठेच दाद मिळत नाही. सकारात्मक गोष्ट होताना दिसत नाही. अजूनही शहरामध्ये अवैधरित्या वृक्षतोड केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ उपोषण करत आहोत. तरी, देखील आम्हाला परवानगी नाकारली जात असल्याचे राऊळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.