Pimpri News: घर बसल्या ‘या’ लिंकवर पहा पंतप्रधान आवास योजनेची सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांसाठी आज (सोमवारी) तीन वाजता सोडत काढली जाणार आहे.

लाभार्थ्यांना घर बसल्या www.facebook.com/pcmcindia.gov.in या लिंकवर ही सोडत बघता येणार आहे. त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. या योजनेची सोडत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविली जाणार आहे. तसेच युट्युबद्वारे लाईव्ह दाखविली जाणार आहे. www.facebook.com/pcmcindia.gov.in या लिंकवर नागरिक घर बसल्या सोडत पाहू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

47 हजार 801 अर्ज ठरलेत पात्र
दरम्यान, चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. एकूण 47 हजार 878 अर्ज आले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. चऱ्होतील 1442 सदनिका, रावेतमध्ये 934 आणि बोऱ्हाडेवाडीत 1288 अशा एकूण 3664 सदनिका असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.