Pimpri News: महिला दिनानिमित्त महापालिकेतर्फे ‘We­­-YUVA’ चॅलेंज स्पर्धा

विजेत्या महिलेला एका दिवसाचे ‘आयुक्त’ होण्याची संधी

एमपीसी न्यूज – शहरी प्रशासनातील महिलांचा सहभाग केवळ वाढविण्यासाठी नाही, तर महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने We­­-YUVA (Youth Urban Vision Accelerator) चॅलेंज सुरू केले आहे. शहरी प्रशासनात स्त्री शक्तीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे. हे आव्हान 18-25 वर्षे वयोगटातील सर्व महिलांसाठी खुले असणार आहे. विजेत्या एका दिवसाचे ‘आयुक्त’ होण्याची संधी मिळणार आहे.

याबाबतची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

शहराला 2030 पर्यंत ‘भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर’ बनविण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहर परिवर्तनाच्या कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष व विकासाच्या कोणत्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे. याविषयी व्यक्त होण्याचे व्यासपीठ या निमित्ताने महिलांना उपलब्ध होणार आहे.

या चॅलेंजच्या विजेत्या महिलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक दिवसासाठी ‘आयुक्त’ होण्याची संधी मिळणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्याच्या कोरोना काळातही महिला विविध आघाड्यांवर काम करत आहेत. सार्वजनिक आरोग्य जपणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स पासून आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत अगणित महिला कोविड 19 चा पराभव करण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करत आहेत. महिलांना प्रशासकीय अधिकार, निर्णय घेणे तसेच या नियमांची अंमलबजावणी करणे. या सर्वच पातळ्यांवर सामान अधिकार मिळावेत. कोठेही लिंग भेदाचा सामना करायला लागू नये. यासाठी प्रशासकीय कामकाजाची संरचना आणि प्रणालीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

याच निकषांच्या आधारावर ” We­­-YUVA ‘ चॅलेंजची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे महिला केवळ योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सहभागी ना होता, योजनेच्या संकल्पना निर्मितीपासून या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील.

सन 2030 पर्यंत देशातील सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि राहण्यायोग्य शहर बनविण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ध्येय साध्य करण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करताना कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे या आव्हानाच्या माध्यमातून महिलांना सुचवता येईल, असे आयुक्त पाटील म्हणाले.

सहभागी महिलांकडून त्यांच्या संकल्पना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये 600 शब्द जास्तीत जास्त अथवा दोन मिनीटांचा व्हिडीओ अशा स्वरुपात मागवीत आहे.

या आव्हानामध्ये सहभागी होणाऱ्या महिला या तीन घटनावर आधारित त्यांच्या कल्पना, विचार किंवा अंमलबजावणीयोग्य उपाय क्यूआर कोड स्कॅन करुन अथवा (गूगल फॉर्म दुवा: https://forms.gle/HYR8RZ1x8NrrhuE29) किंवा [email protected] वर 22 मार्चपर्यंत पाठवू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.