_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: अंकुशराव लांडगे यांनी पक्षासाठी उपसलेल्या कष्टाची भाजप परतफेड करणार का ?

पिंपरी चिंचवडमधील भाजप निष्ठावंताचा सूर

एमपीसी न्यूज – कै. अंकुशराव लांडगे यांचे कुटंबीय गेल्या 40 वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ आहे. त्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष वाढीसाठी प्रचंड कष्ट घेतले होते. त्या कष्टाची परतफेड म्हणून भाजपकडून लांडगे कुटुंबियांतील रवी लांडगे यांना स्थायीचे सभापतीपद दिले जावे, असा सूर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आज (मंगळवारी) दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. शुक्रवारी (दि. 5) निवडणूक होईल. महापौरपद आणि सत्तारूढ पक्षनेतेपद चिंचवड विधानसभा मतदारसंघाकडे आहे. त्यामुळे आता स्थायीचे सभापतीपद चिंचवडलाच की भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपचे पहिले बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे हे सुद्धा स्थायी समितीमध्ये आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्याही मर्जीतले म्हणून रवी लांडगे ओळखले जातात. तसेच सत्ताधारी भाजपमधील सर्व गटांना मान्य असणारा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत रवी लांडगे हे “डार्क हॉर्स” ठरण्याची शक्यता आहे. शहरात पक्षाला वैभव प्राप्त करून देणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष कै. अंकुशराव लांडगे यांचे रवी लांडगे हे पुतणे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

रवी लांडगे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. तसेच ते भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मर्जीतले समजले जातात. शांत आणि मितभाषी असलेले रवी लांडगे यांच्याकडे भाजपमधील सर्व गटांना मान्य असणारा चेहरा म्हणूनही पाहिले जाते.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीला सामोरे जात असताना शेवटच्या वर्षीचे स्थायी समिती सभापतीपद सर्व गटांना मान्य होणाऱ्या व्यक्तीला दिल्यास भाजपला राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते. त्याचा विचार करून या पदासाठी रवी लांडगे यांच्या नावाला पसंती मिळेल, अशी शक्यता शहराच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

रवी लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष कै. अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला ताकदीचा राजकीय पक्ष बनवण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे यांनी प्रचंड कष्ट उपसले. त्यांनी भाजपचे दोन आकडी नगरसेवक निवडून आणले होते. लांडगे कुटुंबीय जनसंघापासून भाजपचे काम करत आहेत. गेली 40 वर्षे हे कुटुंब भाजपसोबत एकनिष्ठ राहिले आहे.

कै. अंकुशराव लांडगे यांनी कठीण प्रसंगात हिंमतीने राजकीय लढा देत शहराच्या राजकारणात भाजपचा स्वतंत्र दबदबा निर्माण केला. राजकीय वादातूनच त्यांची हत्या झाली. कै. अंकुशराव लांडगे यांनी पक्षासाठी दिलेल्या या योगदानाची दखल घेण्याची आता वेळ आली आहे. पक्ष ही दखल घेईल. तसेच भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे हे कै. अंकुशराव लांडगे यांच्या कुटुंबियांना महापालिकेतील स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पद मिळवून देतील, अशी आशा निष्ठावंताना आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.